Ad will apear here
Next
हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील यांचा प्रचार वेगात


हिमायतनगर :
हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांचा प्रचार दौरा सुरू आहे. त्यांच्या दौऱ्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

हिमायतनगर तालुक्यासह मतदारसंघातील ग्रामीण भाग आमदार नागेश पाटील व नुकतेच शिवसेनेत आलेले गंगाधर पाटील-चाभरेकर शिवसेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी पिंजून काढत आहेत. प्रचारादरम्यान विविध ठिकाणी कोपरा सभा होत आहेत. अनेक ठिकाणी पक्षप्रवेश सोहळे होत आहेत. ‘मतदारसंघातील जनता आजपर्यंत शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आणि भविष्यातही जनता शिवसेनेसोबत राहील,’ असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.



‘देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार पारदर्शकपणे काम करीत आहे. विविध जनकल्याणकारी उपक्रम राबवून ते तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी हे सरकार कटिबद्ध राहिले आहे. शेतकरी आणि शेतमजूर यांना केंद्रबिंदू मानून सरकारने आजपर्यंत यशस्वी वाटचाल केली असून, जनता जनार्दनाच्या आशीर्वादाच्या बळावर भविष्यातही अशीच वाटचाल कायम सुरू राहील,’ असा विश्वास वाटत असल्याचे पाटील यांनी सभेत सांगितले.



गंगाधर पाटील-चाभरेकर, हिमायतनगर शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, भाजप तालुकाध्यक्ष आशिष सकवान, नगराध्यक्ष कुणाल राठोड, उपतालुका-प्रमुख विलास वानखेडे, संजय काईतवाड, ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश जाधव, सत्यव्रत ढोले, विठ्ठल ठाकरे, युवा सेना तालुकाप्रमुख विशाल राठोड, राजेश जाधव, प्रकाश रामदिनवार, राम नरवाडे, योगेश चिल्कावार, गजानन पाळजकर, अमोल धुमाळे, विपुल दंडेवाड, पापा शिंदे, सालीम शेवाळकर, दीपक कात्रे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZWJCF
Similar Posts
आमदार नागेश पाटील यांच्या प्रचारात मुस्लिम बांधवांचा मोठा सहभाग हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठे बदल होताना पाहायला मिळत आहेत. काँग्रेस पक्षाकडून इच्छुक असलेले गंगाधार पाटील-चाभरेकर यांना उमेदवारी न दिल्यामुळे काँग्रेसमधील मुस्लिम समाजाचा मोठा गट नाराज झाला. मुस्लिम समाजातील अनेकांनी आमदार नागेश पाटील आणि गंगाधार पाटील-चाभरेकर यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला
हिमायतनगरमध्ये नागेश पाटील यांच्या प्रचारासाठी अभिनेत्री अमृता रावचा रोड शो हिमायतनगर : हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या प्रचारासाठी प्रसिद्ध अभिनेत्री अमृता राव यांचा रोड शो आयोजित करण्यात आला आहे. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता हदगाव आणि हिमायतनगर या दोन्ही तालुक्यांमध्ये हा रोड शो होणार आहे.
विकासासाठी नागेश पाटील यांना निवडून द्या : कुणाल राठोड हिमायतनगर : ‘केंद्र आणि राज्यातील सरकारने सामान्य जनतेला, कष्टकऱ्यांना, कामगारांना, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनेक लाभ मिळवून दिलेले आहेत. त्यामुळे हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांना निवडून द्यावे,’ असे आवाहन हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी केले
हिमायतनगर तालुक्यात सरासरी ७२ टक्के मतदान हिमायतनगर : नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात सरासरी ७२ टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी पाऊस सुरू असूनही, शेतकरी आणि शेतमजुरी करणाऱ्या मतदारांनी मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language